Omnicron BF.7 वेगाने वाढतोय! खोकल्याची 'ही' 2 लक्षणे सांगतील तुम्हाला कोविड आहे की नाही ते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omnicron BF.7

Omnicron BF.7 वेगाने वाढतोय! खोकल्याची 'ही' 2 लक्षणे सांगतील तुम्हाला कोविड आहे की नाही ते

Omnicron BF.7: ओमिक्रॉनचा नवा सब व्हॅरिएंट BF.7च्या केसेस चीनमध्ये वेगाने वाढत आहे. अशा वेळी भारतीयांमध्येही या नव्या व्हॅरिएंटला घेऊन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हेल्थ अथॉरिटीच्या म्हणण्यानुसार मात्र हा व्हॅरिएंट भारतीयांच्या संपर्कात आधीच येऊन गेलाय. त्यामुळे भारतीयांची इम्युनिटी आधीच मजबूत झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मात्र तुम्हाला सर्दी तापासारखी लक्षणं दिसून आलीत तर तो नेमका कोरोनाच आहे की नाही हे तुम्हाला कसं कळेल? त्यावेळी या दोन लक्षणांतून तुम्हाला कोरोना आहे की नाही ते कळेल. चला तर आज आपण कोरोनाची ओळख पटवणाऱ्या या दोन लक्षणांबाबत जाणून घेऊया.

एक्सपर्टच्या मते, ज्यांनी अजूनही व्हॅक्सिन घेतलेली नाही त्यांची इन्युनिटी अजूनही कमजोर आहे. तर ज्यांनी व्हॅक्सिन घेतली आहे त्यांना कोरोना झाल्यास हलकी लक्षणे दिसून येते.

ओमिक्रॉनचा हा नवा व्हॅरिएंट इतर व्हॅरिएंटच्या तुलनेत जास्त धोकादायक असल्याचे सांगितले जातेय. (Winter)

कोविड कफ कसा ओळखायचा?

कोरडा खोकला - कोरोनाच्या जास्तीत जास्त रूग्णांना कोरडा खोकला जाणवतो. हा कफ सुरुवातीला फार किरकोळ असतो. मात्र हळू हळू तुम्हाला श्वास घ्यायालाही त्रास होऊ लागतो. एखाद्या व्यक्तीस दीर्घकाळापर्यंत ही समस्या असल्यास त्याला कोविड असू शकतो.

अशक्तपणा - हिवाळ्यात जाणवणाऱ्या सामान्य कफमध्ये अशक्तपणा जाणवतो. मात्र कोविड झाला असल्यास अशक्तपणा जास्त जाणवतो. रात्री झोपतानाही या रूग्णास फार त्रास होतो.

नाक वाहणे आणि ताप - कफ व्यतिरिक्त कोरोना व्हायरसचे आणखी काही लक्षणं आहेत. उदा. गळ्यात दुखणे, नाक वाहणे, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे.

हेही वाचा: China Covid-19 Outbreak : चीनमध्ये चाललंय काय? प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा नियम केला रद्द

कोरोनाची लक्षणे जाणून घेणे का महत्वाचे?

असे अनेक लोक आहेत ज्यांना कोरोनाचे संक्रमण झाले असते मात्र त्यांना लक्षणे दिसून येत नाही. मात्र कोरोनाचा व्हायरस वेगाने वाढतो. तुम्हाला तुमच्या शरीरात अशी कुठलीही हलकी लक्षणे दिसल्यास टेस्ट करून घ्यावी. जेणेकरून तुमचा वेळेत उपचार होईल.