
मनोज पटवर्धन
यागळ्या निष्क्रिय ध्यान विधींना एका अर्थाने ‘शांत ध्यान’ पद्धती असंही म्हणता येईल. या प्रकारांमध्ये बरीच विविधता आहे. म्हणून ओशो वेळोवेळी सावध करायचे. ते सांगायचे, ‘कुठलाही प्रकार एकदाच करून पाहिला, की ‘तो उपयोगी पडतो आहे किंवा नाही’ असं लगेच ठरवता येत नाही. त्यासाठी त्या पद्धतीचा परतपरत अवलंब करावा लागेल. असं करून मग ज्या ध्यानात मन छान रमतंय असं वाटतं, ते प्रकार नित्याच्या साधनेत ठेवा.