
मनोज पटवर्धन
गेल्या आठवड्यात आपण ओशो रजनीश यांच्या एकंदर जीवनकार्याविषयी माहिती घेतली. ओशोंनी ध्यानाच्या क्षेत्रात असंख्य प्रयोग केले. आलेल्या प्रत्येक साधकाला शेवटपर्यंत त्यांनी फक्त एकच अट घातली होती. ती म्हणजे ‘न चुकता दररोज नित्य ध्यान’. ही अट सहज पूर्ण करता यावी यासाठी त्यांनी ध्यानाचे अक्षरशः शेकडो प्रकार शिकवले. या सगळ्या प्रकारांची ढोबळपणे दोन भागात विभागणी होते. पहिला म्हणजे सक्रिय (डायनॅमिक) पद्धती आणि दुसरा म्हणजे निष्क्रिय (स्टॅटिक) पद्धती.