
"ऑस्टिओपोरोसिस हा 'शांत आजार' आहे. जेव्हा लक्षणं दिसतात तेव्हा अनेकदा हाडं आधीच झिजलेली असतात."
परिचय - ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय?
आपण हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब या आजारांबाबत जागरूक असतो; परंतु आपल्या शरीराचा खरा पाया असलेल्या हाडांची तब्येत किती जण तपासतो? हार्ड आपल्याला चालायला, उभं राहायला आणि जगायला मदत करतात; पण एक आजार आहे जो ही ताकद हळूहळू हिरावून घेतो. आणि तो म्हणजे ऑस्टिओपोरोसिस.भारतामध्ये, दरवर्षी ३० लाखांहून अधिक लोकांना फ्रॅक्चर होते, ज्यांपैकी बरीच कारणं ऑस्टिओपोरोसिसमुळे असतात. स्त्रियांचं प्रमाण विशेषतः जास्त आहे. एकदा फ्रेंक्चर झालं की, चालणं, बसणं, अगदी दैनंदिन जीवनही अडचणीत येतं.ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची आतून सुरू होणारी झीज, जी सुरुवातीला कोणतीही लक्षणं न देता, शेवटी मोठ्या आपत्तीला कारणीभूत ठरते. 'आग लागल्यावर विहीर खणण्यात काही उपयोग नाही. ' म्हणूनच, वेळेवर तपासणी व उपचार गरजेचे आहेत.