
डॉ. मृण्मयी मांगले
आपण मागील लेखात पाहिल्याप्रमाणे दैनंदिन जीवनात होणारे लहान सहान आजार हे बऱ्याचदा शरीरातील बिघाड नसून बिघाड दुरुस्त करण्यासाठी शरीराच्या नैसर्गिक बरे होण्याच्या लढ्यामधील प्रक्रिया असते. बाहेरील घटकांमुळे आपल्या शरीरामध्ये ताण निर्माण होतो, तेव्हा त्या ताणावर मात करण्यासाठी शरीर नैसर्गिकरीत्या प्रयत्न करतं आणि त्यामुळे काही लक्षणं दिसून येतात; पण आपण सतत या लक्षणांचं दमन करत राहिलो, तर प्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि शरीरामध्ये जुनाट आजार तयार होऊ लागतात.