Steroid Cream Side Effects: स्टेरॉईडयुक्त क्रीमचा अतिरेक ठरतोय त्वचेसाठी धोकादायक! आजच वापर थांबवा; त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला

Side effects of steroid creams on face: स्टेरॉईडयुक्त क्रीमचा अतिरेक त्वचेसाठी घातक ठरतोय, तज्ज्ञांचा सल्ला – आजच योग्य उपचार सुरू करा.
Excess Use of Face Creams Containing Steroids are Harmful for Skin
Excess Use of Face Creams Containing Steroids are Harmful for Skin sakal
Updated on

थोडक्यात:

  1. स्टेरॉईडयुक्त क्रीमचा अनियंत्रित वापर त्वचेसाठी अत्यंत घातक ठरत असून त्याचे दुष्परिणाम लवकर जाणवतात.

  2. नागपूरसह देशभरात रविवारी ८०० ठिकाणी त्वचारोग शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

  3. फंगल इन्फेक्शनसारख्या त्वचारोगांवर उपचाराचा कालावधी स्टेरॉईडमुळे वाढत आहे.

Why steroid-based creams are harmful for skin: स्टेरॉईडयुक्त क्रिम सहज उपलब्ध आहे. ब्युटी पार्लरमध्ये या क्रिमसह लेझर ट्रिटमेंटचा अनधिकृत उपयोग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हा प्रकार तरुणांपासून वयस्कांच्या त्वचेसाठी धोकादायक ठरतो आहे. मात्र, कोणत्याही यंत्रणेकडून त्याला आवर घातला जात नसल्याचा आरोप त्वचारोग तज्ज्ञ डॉ. श्रद्धा महल्ले यांनी केला.

भारतीय त्वचारोग तज्ज्ञांच्या पुढाकारातून रविवारी (ता.१३) देशभरात एकाच वेळी ८०० त्वचारोग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरातही रमना मारोती मंदिर, एचबी टाऊन, पारडी, जाफरनगर रिंगरोड, ताजनगर, मानकापूर, रजा टाऊन, कामठी रोडसह १२ ठिकाणी शिबिर होतील. या पार्श्‍वभूमीवर डॉ. श्रद्धा महल्ले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

त्या म्हणाल्या कॉस्मॅटिक आणि फेअरनेसच्या नावाखाली चेहऱ्यावर स्टेरॉईडचा अतिवापर होत आहे. यामुळे वयाच्या पस्तिशीनंतर उद्‍भवणारे त्वचा विकार विशीतच गाठत असून शहराप्रमाणे ग्रामीण भागातही याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे त्या म्हणाल्या.

औषधोपचाराचा कालावधी वाढला

स्टेरॉईडयुक्त क्रिमच्या अतिवापरामुळे त्वचेला खाज निर्माण करणाऱ्या गजकर्णाच्या जिवाणूंची प्रतिकारशक्ती वाढते. पूर्वी फंगल इन्फेक्शनवर औषधोपचारासाठी पंधरा दिवसांचा अवधी पुरेसा होता. आता हा कालावधी वाढून दीड महिन्यांवर गेला आहे.

स्टेरॉईडच्या अतिवापराचे दुष्परिणाम

  • त्वचा पातळ होणे

  • त्वचेचा संसर्ग होणे

  • त्वचेवर स्ट्रेच मार्क

  • रोसेसिया होणे

  • पुरळ येणे

  • रंगद्रव्य बदल

  • बुरशीजन्य संसर्गाची भीती

निरोगी त्वचेसाठी संतुलित आहार घ्यावा. शारीरिक हालचाली आणि त्वचेची योग्य काळजी घ्यावी. स्वतः फार्मसीमध्ये जाऊन त्वचेवरील उपचारासाठी औषध घेणे, अनियंत्रित सौंदर्यप्रसाधनाचा वापर टाळावा. त्वचेसंदर्भातील तक्रारी, उपचार हे त्वचारोगतज्ज्ञांकडूनच घ्यावेत.

- डॉ. श्रद्धा महल्ले, त्वचारोगतज्ज्ञ, नागपूर

FAQs

  1. स्टेरॉईडयुक्त क्रीमचा वापर का टाळावा? (Why should steroid-based creams be avoided?)
    — या क्रीममुळे त्वचा पातळ होते, संसर्ग वाढतो आणि अनेक त्वचाविकार निर्माण होतात.

  2. स्टेरॉईडयुक्त क्रीमचा दीर्घकालीन वापर काय परिणाम करतो? (What are the long-term effects of using steroid creams?)
    — त्वचेवर स्ट्रेच मार्क्स, पुरळ, बुरशीजन्य संसर्ग आणि रंगद्रव्याचे बदल होऊ शकतात.

  3. त्वचेसाठी योग्य उपचार कसे घ्यावेत? (How to take proper treatment for skin problems?)
    — त्वचारोगतज्ज्ञांकडूनच सल्ला घेणे आवश्यक असून स्वयंपूर्ण औषधोपचार टाळावेत.

  4. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काय करावे? (What should be done to keep the skin healthy?)
    — संतुलित आहार, व्यायाम, स्वच्छता आणि योग्य सौंदर्यप्रसाधनांचा वापर याकडे लक्ष द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com