

FDA approved new drug for pancreatic cancer treatment
sakal
पॅनक्रिएटिक कॅन्सर म्हणजेच स्वादुपिंडाचा कर्करोग हा गंभीर आजार मानला जातो. या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे अनेकदा स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे तो उशिरा लक्षात येतो. मात्र, आता पॅनक्रिएटिक कॅन्सरच्या रुग्णांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या FDAने प्रगत पॅनक्रिएटिक कॅन्सरसाठी नव्या औषधाला मंजुरी दिली आहे. हे औषध कॅन्सरच्या वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या KRAS प्रोटीनवर काम करते.