

Pancreatic Cancer Symptoms
sakal
PANCREATIC CANCER EARLY WARNING SIGNS: पाठदुखी झाली की आपण ती अनेकदा चुकीची पोझिशन, जास्त काम किंवा स्नायूंवर आलेला ताण यामुळे झाली असं समजतो. पण काही वेळा शरीरात होणारे असे सामान्य वाटणारे बदल एखाद्या गंभीर आजाराचा संकेतही असू शकतात. स्वादुपिंडाचा कॅन्सर (Pancreatic Cancer) हा असाच एक आजार आहे, ज्याची सुरुवातीची लक्षणं अनेकदा सहज लक्षात येत नाहीत.
पाठीच्या मधल्या भागात सतत दुखणं, कोणताही प्रयत्न न करता वजन कमी होणं, अचानक डायबेटीस होणं किंवा पायाच्या पोटरीत अनोखी वेदना जाणवणं; अशी स्वादुपिंडाच्या कॅन्सरची ६ लक्षणं जाणून घ्या, जी सामान्य वाटल्यामुळे अनेकदा दुर्लक्षित केली जातात.