मन-निर्मळ : ‘माझं नशीबच खराब...’

‘माझं नशीबच खराब’ हा विचार प्रयत्नांवर पडणारा पडदा; फेटलिस्टिक दृष्टिकोनातून बाहेर पडून तयारी, संधी आणि कृतीकेंद्रित भाषा स्वीकारण्याचा मानसशास्त्रीय वेध
The Trap of 'Bad Luck': How Fatalism Kills Ambition

The Trap of 'Bad Luck': How Fatalism Kills Ambition

Sakal

Updated on

डॉ. सुवर्णा बोबडे, समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

‘‘मॅडम, खरं सांगायचं तर माझं नशीबच खराब आहे.’’ समोर बसलेली तरुणी खात्रीने बोलत होती.

‘‘सगळे पुढे जातायत. कुणाला चांगली नोकरी, कुणाला संधी... माझ्याबाबतीत मात्र काहीच होत नाही. कितीही केलं तरी शेवटी अपयश माझ्याच वाट्याला येतं.

मी विचारलं, ‘‘तू ‘कितीही केलं’ म्हणतेस, त्यात नेमकं काय केलं आहेस?’’

ती थोडी थांबली. ‘‘मी नोकरीसाठी अर्ज करते, पण मुलाखतीसाठी बोलावणे येत नाही. मग मुलाखतीपूर्वीच वाटतं की माझी निवड नाही होणार.’’

‘‘मग त्याचा पुढच्या अर्ज करण्यावर आणि तयारीवर परिणाम होतो का?’’

ती शांतपणे म्हणाली, ‘‘मन लागत नाही, कारण वाटतं की काही उपयोग नाही.’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com