How To Do Parivrtta Parsvakonasana: परिवर्त पार्श्व कोनासनाचे दोन प्रकार असतात. त्यातील एक प्रकार पुढे दिला आहे. परिवर्त पार्श्वे कोनासन कसे करावे, त्याचे लाभ काय आणि हे आसन करताना कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेऊया. .असे करावे आसन• प्रथम ताठ उभे राहून दोन्ही पायांत साधारणपणे अडीच ते तीन फुटांचे अंतर घ्यावे. • त्यानंतर दोन्ही हात बाजूने खांद्याच्या रेषेत वर घ्यावे, आता उजवे पाऊल उजवीकडे वळवावे.• उजवा गुड्धा हळूहळू वाकवावा, मांडी जमिनीला समांतर येईल या पद्धतीने मांडी व पोटरी यामध्ये साधारण काटकोन करण्याचा प्रयत्न करावा..Yoga For Cough And Cold: सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी करा 'ही' योगासने.• त्यानंतर कमरेतून उजव्या बाजूला मागे वळावे व हळूहळू कमरेतून मांडीच्या दिशेला वाकण्याचा प्रयत्न करावा.• आता डावा हात उजव्या मांडीवरून घेऊन खालच्या दिशेला घ्यावा व उजवा हात पाठीमागच्या बाजूने खालच्या दिशेला घ्यावा. दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफावी.• पाठीतून, कंबरेतून जास्तीत जास्त वळावे म्हणजे हाताची पकड घट्ट करता येईल. त्यानंतर मान समोरच्या बाजूला ठेवा व छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे आसन स्थिती घेण्याचा प्रयत्न करावा..लाभ• या आसनाच्या नियमित सरावाने अपचन, गॅस, ऑसडिटी हे त्रास कमी होण्यास उपयोग होतो.• पाठीच्या कण्याला उत्तम पीळ बसल्याने पाठदुखीच्या तक्रारी दूर होतात..PCOS Management: PCOS वर नियंत्रण ठेवायचे असेल तर ही योगासने नियमित करा, होतील भरपूर फायदे.काळजी• गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन आसन करावे. - मनाली देव.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.