Parkinson's Cases Rise: आयुर्मान वाढतंय, पण धोकाही! देशात पार्किन्सनचे १२ लाख रुग्ण; पुढील १० वर्षांत संख्या दुप्पट होण्याची भीती

Parkinson’s Disease in India: वाढत्या आयुर्मानासोबत देशात पार्किन्सनच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून पुढील दशकात ती दुप्पट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Parkinson's Disease

Parkinson's Disease

sakal

Updated on

वाढत्या आयुर्मानामुळे देशात पार्किन्सन आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सध्या सुमारे १२ लाख रुग्ण या आजाराशी झुंज देत आहेत. पुढील दहा वर्षांत ही संख्या दुप्पट होण्याची भीती आहे. पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण दीडपट अधिक असून, ४० वर्षांखालील तरुणांमध्येही आजाराची लक्षणे दिसत असल्याचे वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.

पार्किन्सन हा मेंदूशीसंबंधित आजार असून, तो मन, शरीराच्या हालचाली आणि मेंदूच्या कार्यावर परिणाम करतो. ११ एप्रिल हा दिवस 'जागतिक पार्किन्सन दिन' म्हणून साजरा होतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com