- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
आजच्या तरुणींपैकी दहापैकी तीन मुलींना पीसीओडी/पीसीओएस असल्याचं निदान होतंय. केस गळणं, वजन वाढणं, पाळी अनियमित होणं, पिंपल्स येणं, ही सगळी लक्षणं दिसली, की लगेच हार्मोनल गोळ्या किंवा गर्भनिरोधक देऊन तात्पुरती शांती दिली जाते; पण फंक्शनल मेडिसिननुसार, ‘हे सगळं का होतंय?’ विचारणं गरजेचं आहे. याचं कारण, केवळ हार्मोन्स दोषी नाहीत. पीसीओडी म्हणजे संपूर्ण शरीराचं (आणि मनाचंही) असंतुलन.