
Health News : मानसिक विकारांबाबत लोकांना हवे समुपदेशन
पुणे : ‘सकाळ सोबत बोलूया’ ही २४ तास मोफत हेल्पलाइन उपक्रम अडीच वर्षांपासून सुरु आहे. आतापर्यंत राज्यभरातून १६ हजार लोकांनी हेल्पलाइनवर मुक्त संवाद साधला आहे. यावर येणाऱ्या कॉल्सच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने काळजी, चिडचिडेपणा, मानसिक विकारांमुळे येणारा ताण व चिंता यामुळे येणाऱ्या नैराश्यासंदर्भातील कॉल्सचे प्रमाण ४९.७ टक्के होते.
या हेल्पलाइनवर फोन करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ६२.१ टक्के तर महिलांचे प्रमाण ३७.४ टक्के होते. हेल्पलाइनवर येणाऱ्या कॉल्सच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने काळजी, चिडचिडेपणा, मानसिक विकारांमुळे येणारा ताण व चिंता यामुळे येणारे नैराश्य यासंदर्भातील कॉल्सचे प्रमाण ४९.७ टक्के होते.
नातेसंबंधातील ताण-तणाव, वैवाहिक सहजीवनामधील समस्या, एकतर्फी प्रेमामुळे येणाऱ्या नैराश्याचे प्रमाण १९.३ टक्के होते. नोकरी व व्यवसायातील आर्थिक अडचणींमुळे आलेले नैराश्य, आनुवंशिक आजार, मानसिक आरोग्याच्या समस्या व कोरोनामुळे आलेल्या नैराश्यायासंदर्भातील कॉल्सचे प्रमाण त्याखालोखाल होते.
२४ तास मोफत समुपदेशन
‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने we are in this together या मोहिमेंतंर्गत आणि कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसॲबीलीटीजच्या सहकार्याने ताणतणाव, मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ हा हेल्पलाइन उपक्रम सुरु आहे.
यात तज्ज्ञ समुपदेशक, मानसिक विकारतज्ज्ञ, मानसशास्त्रतज्ज्ञांची टीम हेल्पलाइनवर फोन करणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधार देत, त्यांचे २४ तास मोफत योग्य समुपदेशन करत आहेत.
ऑनलाइन अपॉइंटमेंट
काही लोकांना सातत्याने समुपदेशन व मार्गदर्शन सेशन्सची गरज असते. ही गरज लक्षात घेऊन, मानसिक ताणतणाव व नैराश्यामुळे उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांवर नाममात्र सशुल्क दरात तज्ज्ञ समुपदेशकांचे मार्गदर्शन घेण्याकरिता
we are in this together या वेबसाईटद्वारे ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. वेबसाईटद्वारे आपल्या सोयीनुसार, वेळेनुसार तज्ज्ञ समुपदेशकांची अपॉइंटमेंट नागरिकांना बुक करता येईल.
वयोगटानुसार वर्गीकरण
१८ ते २९ वयोगट ८.१
३० ते ४९ वयोगट २१.४
५० ते ६९ वयोगट ४९.४
७० पेक्षा अधिक वयोगट २१.१
ठिकाणांनुसार कॉल्स
ग्रामीण भाग ४.९
शहरी भाग ४८.६
निमशहरी भाग ४६.५
शिक्षणानुसार कॉल्स
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झालेले ८.६
डिप्लोमाधारक १३.४
उच्च शिक्षित १४.९
पदव्युत्तर पदवीधारक २०.५
पदवीधारक ४२.६
व्यवसायानुसार वर्गीकरण (प्रमाण टक्क्यांत)
बेरोजगार, सेवानिवृत्त, शेतकरी, कामगार १८.९
गृहिणी १०.१
व्यावसायिक ११.१
विद्यार्थी वर्गांचे ११.७
इतर क्षेत्रातील नोकरदार १६.३
खासगी नोकरदार ३१.९
असा साधा संवाद
‘सकाळ सोबत बोलूया’ ०२०- ७११७१६६९ या क्रमांकावर फोन करून आपणही आमच्याशी मनमोकळेपणाने बोला. आपली व्यक्तिगत माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.