

Everything to know about Spinal Tuberculosis
sakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
Spinal Tuberculosis Symptoms, Causes, Treatment: आजकाल पाठदुखीची तक्रार सामान्य झाली आहे आणि अनेकदा याला फक्त चुकीच्या बसण्याच्या सवयी, व्यायामाची कमतरता किंवा पोस्चरच्या समस्या कारणीभूत असल्याचं मानलं जातं. पण सतत जाणवणारी पाठदुखी फक्त याच कारणांमुळे असू शकते, असं नाही. कधी कधी ती स्पायनल ट्युबरक्युलोसिस (Pott’s Spine) मुळे देखील होऊ शकते, असं तज्ज्ञ सांगतात. हा आजार मणक्यांच्या हाडांचा भाग (vertebrae) वर परिणाम करतो आणि योग्य उपचार नाही मिळाले कायमचं नुकसान (Permanent Damage) किंवा दिव्यांगपणापर्यंत (Disability) नेऊ शकते.