Constant Nasal Congestion and Headache

Persistent Sinus Symptoms Could Be More Than Seasonal Allergy

sakal

Blocked Nose & Headache: सततचे नाक चोंदणे आणि डोकेदुखीः साधी ऍलर्जी की नाकातील घातक गाठी? वेळीच व्हा सावध !

Constant Nasal Congestion and Headache: सतत नाक चोंदणे आणि डोकेदुखी ही साधी ऍलर्जी नसून नाकातील घातक गाठींचे संकेत असू शकतात, त्यामुळे वेळेवर तपासणी महत्त्वाची.
Published on

गेल्या काही वर्षांमध्ये विदर्भात जिथे बघाल तिथे गेल्या रस्ते खोदकाम, मेट्रोचे पिलर, नवे फ्लायओव्हर, सीमेंटचे ढिग... शहर प्रगतीचं प्रतीक झालं असलं, तरी हवेतलं वातावरण मात्र आपल्या नाकासोबत सरळ भांडणाला उतरतंय.

रमेशला नेहमी सर्दीचा त्रास व्हायचा. सुरुवातीला शिंका येणे, नाक गळणे यावर त्याने मेडिकलमधून मिळणारे तात्पुरते "नेझल स्प्रे" वापरून वेळ मारून नेली. पण काही वर्षांतच त्याचे नाक कायमचे चोंदलेले राहू लागले. त्याला जेवणाची चव आणि फुलांचा वास येणे पूर्णपणे बंद झाले. रात्री झोपेत घोरायचा तर कधी श्वस गुदमरल्याने तो दचकून उठायचा आणि दिवसा सतत थकवा जाणवायचा. अखेर जेव्हा त्याने ई.एन. टी तज्ज्ञांची भेट घेतली, तेव्हा त्याला धक्काच बसला. ती केवळ 'साधी ऍलर्जी' नव्हती, तर त्याच्या नाकात मांसाच्या मोठ्या गाठी (Nasal Polyposis) वाढल्या होत्या आणि नाकाचा पडदाही वाकडा (DNS) झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com