.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
वर्षा ऋतूनंतरचा शरद ऋतूच्या आगमनाचा सध्याचा संधिकाल आहे. या काळात पंचमहाभुतांपैकी अग्नी आणि आप या दोन्हीचा आळीपाळीने प्रकोप सुरू असतो. ऊन आणि पाऊस असा हा खेळ मानवी शरीरासाठी त्रासाचा ठरतो. ‘यथा सृष्टी तथा देह’प्रमाणे पावसाळ्यात थंडीची सवय झालेल्या नागरिकांच्या शरीराचे अवयव अचानक सूर्याच्या प्रखर किरणांनी गरम होतात, परिणामी उन्हाळ्यात जमा होणारे पित्त शरद ऋतूत उत्तेजित होते आणि त्याची लक्षणे शरीरात दिसूही लागतात.