

Latest Pregnancy Research 2026| New Placenta-on-Chip Technology Could Transform Pregnancy Research and Maternal Health
sakal
गर्भाशयात भूगाच्या वाढीच्या दृष्टीने अपरा (वार) हा अवयव महत्त्वत्पूर्ण समजला जातो. त्याद्वारे आईकडून बाळाला ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक घटकांचा पुरवठा होतो. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचे कामही त्याद्वारे होते; परंतु गर्भधारणेच्या कालावधीत 'अपरा'चा अभ्यास करणे अत्यंत कठीण समजले जाते. या महत्त्वाच्या अवयवाबद्दल अद्याप अनेक गोष्टी उजेडात आलेल्या नाहीत. ही अडचण दूर करण्यासाठी मुंबईच्या 'आयसीएमआर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन विमेन्स हेल्य आणि 'आयआयटी बॉम्बे येथील संशोधकांनी 'प्लेसेटा-ऑन-चिप' हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. याबाबतचे संशोधन नुकतेच 'वायोफैब्रिकेशन' या आंतरराष्ट्रीय निपवकालिकात प्रसिद्ध झाले आहे.