
आशा नेगी - लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
आपल्या आयुष्यात काय होणार, हे खरंतर कुणाच्याच हातात नसतं; पण जे काही आपल्यासमोर येतं, त्याला कसं सामोरं जायचं आणि त्यासाठी आपण आधीच कितपत तयार आहोत, हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं.
आजचं जग झपाट्यानं बदलतंय. आपली जीवनशैली, खाणं-पिणं, झोपेचं वेळापत्रक – सगळंच गडबडलेलं आहे. आज आपण फिट वाटत असलो, तरी उद्या अचानक काही गंभीर आजार समोर उभा ठाकला, तर काय? अशा वेळी फक्त मानसिक नाही, तर आर्थिक तयारीही गरजेची आहे.