
Traditional Indian dining on leaves explained: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच परंपरा आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित चांगल्या गोष्टींबद्दल बोलत असतात. अलिकडेच त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान कमला प्रसाद बिस्सेसर यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी डिनरचे आयोजित केले होते. जिथे पंतप्रधान मोदींना सोहरीच्या पानांवर जेवण देण्यात आले. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या लोकांमध्ये या सुंदर सोहरीच्या पानांवर जेवणाचे खूप महत्त्व आहे. भारतात केळीची पाने, वड, पलाश पानांपासून बनवलेल्या पानांवर जेवण दिले जाते.