
PM Modi Urges People To Cut Oil Consumption: भारतातील अनेक गंभीर आजारांपैकी एक लट्ठपणा आहे. यामुळे लोकांना अनेक आरोग्याविषयक समस्या उद्भवतात. दरम्यान २००९ नंतर तब्बल १५ वर्षांनी भारतातील लठ्ठपणासाठीची मार्गदर्शक तत्त्वे आता बदलण्यात आली आहेत. याच विषयाला अनुसरून भारतातील लठ्ठपणाला आळा घालण्यासाठी आपण काय केले पाहिजे याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी काल 'मन की बात' या कार्यक्रमात बोलले. तसेच त्यांनी काही लोकांना आज X पोस्ट मध्ये मेंशन करून यामार्फत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रवृत्त केले आहे.