
Post-Diwali Heart Care Tips | Expert Advice for a Healthy Heart After Festive Season caps
sakal
How to Protect Your Heart After Diwali Festivities: दिवाळी म्हणजे मजा, मस्ती, उत्साह, आनंद, चविष्ट फराळ आणि रात्री पर्यंत चालणाऱ्या भरपूर गप्पा. पण या सगळ्यात बऱ्याचदा आपण आपल्या शरीराचं आणि खासकरून हृदयाचं आरोग्य दुर्लक्षित करतो. तळलेले, तूपातले पदार्थ जसेकी चकली, चिवडा, शेव; लाडू, करंजीसारखे गोड पदार्थ, फटाक्यांमुळे झालेले प्रदूषण, झोपेची कमतरता या सगळ्याचाच एकत्रितपणे हृदयावर परिणाम होऊ शकतो.