esakal | मासिक पाळी, गर्भवती, स्तनपान आणि लसीकरण; दूर करा गैरसमज

बोलून बातमी शोधा

pregnancy

तुम्ही गर्भवती आहात!, तुमची मासिक पाळी सुरू आहे, तुम्ही बाळाला स्तनपान करत आहात! आणि मग कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची की नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? पण गोंधळून जाऊ नका. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या माजी अध्यक्षा आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आरती निमकर यांनी दिलीत तुमच्या प्रश्नांची उत्तरं, जाणून घ्या.

मासिक पाळी, गर्भवती, स्तनपान आणि लसीकरण; दूर करा गैरसमज

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ
img

केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ‘गरोदर महिलांनी ही लस घेऊ नये,’ असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे गरोदर महिलांनी ही लस घेऊ नये.

img

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक नागरिकांना लस देणे गरजेचे असून त्यासाठी शासन, वैद्यकीय यंत्रणा वेगाने पावले उचलत आहे.

img

अनेक मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये पीसीओडी, ओव्हरी सिस्टच्या समस्या दिसून येतात. या समस्या खूप दिवसांपासून सुरू असतात. त्यामुळे अशा आरोग्य विषयक समस्या असणाऱ्या महिलांनी देखील कोरोना प्रतिबंधक लस घेण्याला हरकत नाही.

img

मासिक पाळी सुरू असताना लस घेण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात लस घेतली तरी चालणार आहे. मात्र, कोणाच्या मनात काही शंका असल्यास एक मानसिक समाधान म्हणून मासिक पाळी येण्यापूर्वी आणि मासिक पाळीच्या पाच दिवसांत ही लस घेणे त्यांनी टाळावे.

img

गर्भधारणा होण्यापूर्वी लस घ्यायला काहीच हरकत नाही. परंतु गर्भधारणेची तुमची ट्रिटमेट काय आणि कशाप्रकारे सुरू आहे, त्याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

img

तुम्ही कोरोना प्रतिबंधक लस पहिला डोस घेतला आहे. त्यानंतर पहिला डोस घेतल्यानंतर आणि दुसऱ्या डोस घेण्यापूर्वीच्या कालावधीत तुम्हाला गर्भधारणा झाली असेल, तर तुम्ही दुसरा डोस घेऊ नका.

img

‘‘मासिक पाळी असली तरी सुद्धा महिलांनी कोरोनाची लस घेण्यास काही अडचण नाही. गर्भवती महिलांना ही लस घेता येणार नाही. गर्भवती असताना अनेक प्रकारच्या लशी टाळण्यात येतात. कोरोनासाठीच्या या लशीत निष्क्रिय जिवंत विषाणू असल्यामुळे ही लस गर्भवती महिलांना देता येत नाही,’’ अशी माहिती डॉ. राजेश्वरी पवार यांनी दिली.