तर काय?

गरोदर असताना सातव्या महिन्यापासून माझ्या नाकावर बारीक पुरळ यायला सुरुवात झाली. त्याच्यावर भरपूर खाजसुद्धा यायची.
pregnant woman Fine acne children ayurvedic garbhsanskar book

pregnant woman Fine acne children ayurvedic garbhsanskar book

sakal

Updated on

प्रश्‍न - गरोदर असताना सातव्या महिन्यापासून माझ्या नाकावर बारीक पुरळ यायला सुरुवात झाली. त्याच्यावर भरपूर खाजसुद्धा यायची. खाजवल्यावर त्यातून रक्त यायचं. आता नाकावर भरपूर डाग पडलेले असल्यामुळे बाहेर जाण्याची मला इच्छा होत नाही. औषधं घेतली, परंतु म्हणावा तसा फरक पडत नाही. बाळ आता सहा महिन्याचे झाले आहे. त्यामुळे कामावर परत जाण्याची वेळ आली आहे. कृपया उपाय सुचवावा.

- सौ. साक्षी केतकर, धुळे

उत्तर - गरोदरपणामध्ये अनेक स्त्रियांना हार्मोन्समधील बदलांमुळे वेगवेगळे त्रास होताना दिसतात. कुठल्याही त्रासावर वेळेवर उपचार घेणं जास्त फायदेशीर ठरतं. तुम्ही नमूद केलेला त्रास पित्त असंतुलनामुळे होण्याची शक्यता जास्त आहे. या दृष्टीने रक्तशुद्धी करण्याकरता महामंजिष्ठादी काढा, मंजिष्ठ सॅन व अनंत सॅन, पित्तशांती या गोळ्या सुरू करणं उपयुक्त ठरेल.

तसेच संतुलनचे यू.सी. चूर्ण, पुनर्नवासव घेणे फायदेशीर ठरू शकेल. नाकावर संतुलनचे राधा फेस ऑइल हलक्या हाताने लावावे. शक्यतो खाजवू नये. आहारातून गवार, वांग, कोबी फ्लॉवर, ढोबळी मिरची, टोमॅटो, दही, चिंच, आंबवलेले पदार्थ शक्यतो पूर्णपणे वर्ज्य करावेत. शक्य झाल्यास एकदा वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com