चेतना तरंग : पूर्वग्रह आणि मते

Prejudice and Opinions: The Art of Letting Go and Positive Thinking : प्रत्येक व्यक्तीबद्दल मत बनवणे स्वाभाविक असले, तरी त्या मतांना चिकटून राहणे दुःखाचे कारण ठरू शकते. प्रेम, करुणा आणि सकारात्मक संगतीतून पूर्वग्रहांपासून मुक्त राहण्याचा मार्ग समजून घ्या.
 Prejudice and Opinions: The Art of Letting Go and Positive Thinking

Prejudice and Opinions: The Art of Letting Go and Positive Thinking

esakal

Updated on: 

जरी तुम्ही लोकांना ‘कोणाविषयीही पूर्वग्रह ठेवू नका किंवा मत बनवू नका’ असे म्हणताना ऐकले असले, तरी दैनंदिन आयुष्यात कोणाबद्दल तरी मत बनवणे किंवा मूल्यमापन करणे अपरिहार्यपणे घडतेच. तुम्ही लोकांच्या वागणुकीला आणि कृतींना एकतर मान्यता देता किंवा नाकारता. परंतु नेहमी लक्षात ठेवा, की प्रत्येक गोष्ट बदलत आहे, आणि तुमच्या मताशी किंवा निर्णयाशी घट्टपणे संलग्न होऊन राहू नका. अन्यथा, तुमचे मत खडकासारखे कठीण आणि पक्के होऊन बसते, ज्यामुळे स्वतःला आणि इतरांनाही दुःख होते.

तुमचे विचार किंवा मते हवेसारखी हलकी असतील, एखाद्या झुळकेसारखी, तर ती सुगंध घेऊन येतील आणि पुढे निघून जातील; किंवा कदाचित दुर्गंधी घेऊन येतील आणि निघून जातील. पण ती मते तिथे कायमची थिटून राहू नयेत.

Loading content, please wait...