Thalassemia : थॅलसेमिया मुक्तीसाठी विवाहपूर्व तपासणी महत्त्वाची

Thalassemia : आनुवंशिकरित्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारा रक्तविकार म्हणून थॅलेसेमियाची गणना होते.
Thalassemia
Thalassemiaesakal

Thalassemia : आनुवंशिकरित्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारा रक्तविकार म्हणून थॅलेसेमियाची गणना होते. विशिष्ट समाजातच याचे रुग्ण आढळतात, असे सांगितले जायचे. पण ते अर्धसत्य आहे. अलीकडे सर्व समाजघटकांत हा आजार आढळतो. परिणामी शासनाने दिव्यांगाच्या यादीत थॅलेसेमियाबाधितांचा समावेश केला. मात्र यापासून मुक्तीसाठी विवाहपूर्व समुपदेशन आणि आरोग्य तपासणी महत्त्वाची ठरते.

आपत्कालीन स्थितीत आलेल्या थॅलेसेमिया बाधितांना तत्काळ उपचार मिळावे. त्यासाठीच त्यांचा दिव्यांगाच्या यादीत समावेश झाला. शरीरात रक्तनिर्मितीत अडथळा आल्याने हा आजार होतो. याचे मायनर आणि मेजर असे दोन प्रकार असून यांना सातत्याने रक्ताची गरज असते.

विशेष असे की, या मुलांचे आयुर्मान साठीच्या पुढे अल्प आहे. सध्या नागपुरात असलेल्या एकूण बाधितांपैकी ७५ टक्के थॅलेसेमियाग्रस्त १८ पर्यंतच्या वयोगटातील आहेत. उर्वरित २५ टक्के चाळीशीत आहेत. दरवर्षी देशात १० हजार रुग्ण जन्माला येतात, अशी माहिती डॉ. विकी रुघवानी यांनी दिली.

Thalassemia
Summer Health Care : बदलत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम; कडक ऊन अन् अवकाळी पावसाने रुग्णांच्या संख्येत वाढ

काय होते आजारात ?

मुलांना २१ दिवसांनंतर रक्त देण्याची आवश्यकता असते.

मुलांमध्ये रक्ताच्या लाल पेशींचे आयुष्य २० दिवसांचेच असते.

लक्षणे

  • मुलांची नखे गुलाबी रंगाची असतात.

  • डोळ्यांच्या बाहुल्यांचा पांढरा भाग पिवळसर दिसतो.

  • मुलांच्या जीभेचा रंग बदलतो.

  • त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो.

  • रोगप्रतिकारशक्ती कमी असते.

  • सांधे निष्क्रिय होणे.

  • डोळ्यांना त्रास होणे.

  • रेटिना खराब होणे.

  • यकृत, किडनीचा त्रास.

कच्छी, लोहाणा, गुजराती, पंजाबी, पारशी, आदिवासी, बंगाली, सिंधी आणि मुस्लिम अशा विशिष्ट समुदायांमध्ये मेजर थॅलसेमिया आढळतो. तो एकूण लोकसंख्येच्या ४ टक्के लोकांना प्रभावित करतो. मेजर थॅलसेमिया रुग्णांना १५ ते ३० दिवसांत एकदा रक्त चढवावे लागते.

रक्त चढविताना एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, सी यासारख्या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी ‘नॅट’ चाचणीयुक्त रक्त द्यावे. या रुग्णांना स्वत: हून थॅलसेमिया होत नाही, परंतु जर त्यांच्या जोडीदारालाही थॅलसेमिया झाला असेल तर त्यांच्या मुलाला थॅलसेमिया होण्याची दाट शक्यता असते. दोन्ही पालकांमध्ये लक्षणे असल्यास, २५ टक्के थॅलेसेमिक मूल होण्याची शक्यता असते.

-डॉ. गुंजन लोणे, हेमॅटोलॉजिस्ट, नागपूर.

Thalassemia
Thalassemia: राज्यात अकरा हजार रुग्ण, थॅलसेमिया ग्रस्त मुलांना मोफत रक्त देण्याची प्रशासनाची ब्लड बँकांना सूचना !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com