
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे ३८व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कमी वयात कर्करोग होण्याची कारणे अनुवंशिकता, चुकीची जीवनशैली, तणाव, प्रदूषण, आणि असंतुलित आहार आहेत. तज्ज्ञांच्या मते, नियमित तपासणी आणि निरोगी जीवनशैलीमुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
Young age cancer risk factors: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या ३८व्या वर्षी कर्करोगाने दुखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रिया यांनी आपल्या अभिनयाने मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये विशेष छाप पाडली होती.
पण कमी वयात कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्यांचा जीव घेतला. कमी वयात कर्करोग होण्याची प्रकरणे वाढत चालली आहे. प्रिया मराठे यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून, तरुणांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. वेळीच सावध झाल्यास कर्करोगासारख्या आजारांवर मात करणे शक्य आहे.