Probiotic Diet : प्रोबायोटिक्स म्हणजे काय? ज्यामुळे अल्झायमर अन् डिमेंशियाचा प्रभाव होतो कमी

प्रोबायोटिक आहार घेतल्यास अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या आजाराचे परिणाम कमी होतात.
Probiotic Diet
Probiotic Dietesakal

Probiotic Diet Useful In Alzheimer and Dementia : जसजसे वय वाढत जाते तसतशी विचार करण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती कमकुवत होत जाते. मात्र प्रोबायोटिक आहार या दोन्ही समस्यांवर प्रभावी उपाय ठरतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, प्रोबायोटिक आहार घेतल्यास अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या आजाराचे परिणाम कमी होतात.

विषाणू आणि जीवाणू ही नावं ऐकलीत की कोणालाही वाटेल आपण एखाद्या रोगाबाबत बोलत आहोत मात्र प्रत्येक जीवाणू आपल्याला हानी पोहोचवत नाही. ते आपले मित्र असतात. आणि श्वासोच्छवासात आणि पचनसंस्थेत ते तंत्र तपासण्याचे आणि त्यावर संतुलन ठेवण्याचे काम करतात. तुम्ही एखाद्या आजारासाठी भरपूर प्रमाणात गोळ्या घेतल्या असेल तर पुढे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रोबायोटिक्स उपयुक्त ठरतात. हे प्रोबायोटिक्स तुम्ही अन्नात आणि पौष्टिक पूरक आहाराद्वारे घेऊ शकता.

संशोधकांनी ५२-७५ वर्षे वयोगटातील १६९ लोकांना तीन महिन्यांचे प्रोबायोटिक लॅक्टोबॅसिलस रॅमनोसस (LGG) उपचार दिले. त्यामुळे या लोकांमध्ये अशक्तपणाची लक्षणे कमी दिसून आलीत. विविष्ट वयानंतर अशक्तपणामध्ये लोक गोष्टी लक्षात ठेवण्यास असमर्थ असतात, त्यांची एकाग्रता कमी होते.

Probiotic Diet
Weekly Veg Diet Plan : चवीशी तडजोड न करता रहा हेल्दी, घ्या पूर्ण आठवड्याचा शाकाहारी डाएट प्लॅन

प्रोबायोटिक्सचे फायदे

शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करणे

जीवनसत्वे आणि इतर हार्नोन्स तयार करणे

कोलेस्ट्रॉल संतुलित करणे

कॅलरीज नियंत्रित करणे (Health)

Probiotic Diet
Anti Ageing Forumula : शास्त्रज्ञांनी शोधला चिरतरुण राहण्याचा उपाय, उंदरांवर यशस्वी प्रयोग

प्रोबायोटिक्स कशात असतात?

प्रोबायोटिक्स पदार्थ असे असतात ज्यात जीवंत जीवाणू असतात. हे जीवाणू दही, ढोकळा, लोणची, किमची, कोंबूचा इत्यादी आंबवलेल्या पदार्थांमध्ये आढळतात. प्रोबायोटिक्सचे सप्लिमेंट्सही येतात. (Diet)

प्रोबायोटिक अन्नाचे आणखी काही फायदे

प्रोबायोटिक अन्न खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते

वजन नियंत्रित राहते

रोगप्रतिकारशक्ती वाढते

हार्मोनल संतुलन

रक्तातील साखर नियंत्रित राहते

चांगली झोप येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com