- डॉ. मालविका तांबे
आयुर्वेदाच्या मतानुसार आजारांचे मूळ आपल्या पचनसंस्थेशी निगडित असते असे सांगितलेले आहे. शरीरातील अग्नीचे कार्य संतुलित असेल तर शरीराचे आरोग्य टिकून राहायला मदत मिळते. या अग्नीला संतुलित ठेवण्यासाठी जेवढे आपल्या आहार-विहारातील अनुशासन महत्त्वाचे आहे तेवढेच महत्त्वाचे आणि मदतीचे असतात प्रो-बायोटिक्स.