प्रक्रियायुक्त पदार्थ आणि आपण

प्रक्रिया केलेले पदार्थ सगळीकडेच असतात. सकाळी भाजलेल्या पावाच्या तुकड्यापासून रात्रीच्या जेवणासाठी वापरलेल्या पास्ता किंवा पिझ्झा साॅसपर्यंत आपण खात असलेला कोणताही पदार्थ हा कोणत्या ना कोणत्या तरी प्रक्रियेतून गेलेला असतो; पण म्हणून सर्वच प्रक्रिया केलेले पदार्थ वाईट असतात का?
sakal
sakalsakal

आरोग्यसंकल्प

गौरी शिंगोटे,आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग

प्रक्रिया केलेले पदार्थ सगळीकडेच असतात. सकाळी भाजलेल्या पावाच्या तुकड्यापासून रात्रीच्या जेवणासाठी वापरलेल्या पास्ता किंवा पिझ्झा साॅसपर्यंत आपण खात असलेला कोणताही पदार्थ हा कोणत्या ना कोणत्या तरी प्रक्रियेतून गेलेला असतो; पण म्हणून सर्वच प्रक्रिया केलेले पदार्थ वाईट असतात का?

प्रक्रियायुक्त अन्न म्हणजे काय?

प्रक्रिया केलेले अन्न म्हणजे कोणतेही अन्न ज्याचे स्वरूप बदलले गेले आहे. हा बदल अनेक कारणांमुळे होऊ शकतो. जसे की, पदार्थ जास्त काळासाठी टिकवणे, पदार्थ अधिक चवदार बनवणे, किंवा तो पदार्थ बनवण्यास सोपा करणे. प्रक्रिया करण्यामध्ये धुणे, कापणे यांसारखे अतिशय साधे टप्पे असतात, तर पदार्थ टिकवण्यासाठी किंवा पदार्थ अधिक चवदार बनण्यासाठी त्यात काही इतर पदार्थ मिसळणे यासारखे थोडे क्लिष्ट टप्पेही असतात.

प्रक्रिया केलेले सर्वच अन्न आपल्यासाठी वाईट नसते. प्रक्रिया केलेल्या अन्नाचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम हा प्रक्रिया किती प्रमाणात केली गेली आहे व त्यात कोणता पदार्थ मिसळला आहे यावर अवलंबून असतो. प्रक्रिया केलेले काही पदार्थ अगदी आरोग्यदायी असतात, तर काही विशेषतः ज्यावर खूपच जास्त प्रक्रिया केलेली असते असे पदार्थ नेहमी खाण्यात आल्यास आरोग्य समस्या उद्‍भवू शकतात.

प्रक्रिया केलेल्या अन्नाचे टप्पे...

अल्प प्रक्रिया केलेले अन्न : हे अन्न फारच थोड्या प्रक्रियेतून जाते. उदा., फळे, भाज्या धुणे व कापणे, दही जमवणे, दाणे भाजणे.

आरोग्यावर परिणाम : यामध्ये बहुतांश नैसर्गिक पोषणतत्त्वे शिल्लक असल्याने सामान्यपणे आरोग्यदायी समजले जाते. प्रक्रिया केलेले स्वयंपाकाचे घटक : तेल, तूप, मीठ, साखर यांसारखे घटक यात येतात.

आरोग्यावर परिणाम : स्वयंपाकासाठी गरज असते म्हणून योग्य प्रमाणात वापरले गेले पाहिजेत. जास्त प्रमाणात वापरले गेल्यास आरोग्य समस्या उद्‍भवू शकतात.

प्रक्रिया केलेले अन्न : पदार्थ चवदार लागावेत व जास्त काळ टिकावेत यासाठी यांचे स्वरूप बदलले जाते. उदा., डबाबंद भाज्या व फळे, चीज, ब्रेड, डबाबंद मासे.

आरोग्यावर परिणाम : पौष्टिक असू शकतात; परंतु त्यात नेहमी मीठ, साखर, चरबी यांसारखे पदार्थ जास्तीचे मिसळलेले असतात. नेहमी लेबल वाचून कमी मिश्रित पदार्थ निवडावेत.

अल्ट्रा प्रोसेस्ड अन्न : कोल्ड्रिंक्स, चिप्स, रेडी-टू-इट जेवणे इत्यादी खूप प्रमाणात प्रक्रिया केलेले असतात. यात सहसा स्वीटनर्स, प्रिझर्वेटिव्ह्ज, कृत्रिम रंग व स्वाद मिसळलेले आढळतात.

आरोग्यावर परिणाम : यात जास्त प्रमाणात मीठ, साखर किंवा स्निग्ध पदार्थ आढळतात. हे जास्त प्रमाणात खाल्ले गेल्यास स्थूलत्व, हृदयविकार, टाइप-२ मधुमेह व काही प्रकारचे कॅन्सर उद्‍भवण्याचा संभव वाढतो.

आरोग्यावर परिणाम

अल्प प्रक्रिया केलेले पदार्थ : हे त्यांच्या मूळ स्वरूपाच्या जवळ असतात व पौष्टिक असतात. उदा., दही पचनाला आवश्यक असे प्रोबायोटिक पुरवते, तर कापलेल्या भाज्यांमुळे दैनंदिन फळे व भाज्या गटातील वाटपाचे प्रमाण मिळणे सुलभ होते.

प्रक्रिया केलेले स्वयंपाकाचे घटक : हे घटक प्रमाणात वापरले गेले पाहिजेत. उदा., शेंगदाणा तेल हेल्दी स्निग्धपदार्थ आहे; परंतु जास्त वापरल्यास कॅलरीज वाढतात. चिमूटभर मिठाने स्वाद वाढतो; परंतु जास्त मीठ रक्तदाबासारख्या समस्या निर्माण करू शकते.

प्रक्रिया केलेले पदार्थ : हे पौष्टिक आणि सोयीचे असू शकतात; परंतु यात मिसळलेले साखर, मीठ किंवा अतिरिक्त स्निग्धपदार्थ टाळणे गरजेचे आहे. उदा., डबाबंद बीन्स, भाज्या किंवा मासे हे प्रथिन व तंतुजन्य पदार्थांचा चांगला स्रोत आहे; परंतु कमी मीठ मिश्रित असल्यास हृदयासाठी चांगले असते.

अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थ : याकडे लक्ष देणे जरूरीचे आहे. यामध्ये नेहमी कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह्ज व स्वीटनर्ससारखे अनेक घटक मिसळलेले असतात. अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांचे नियमित सेवन केल्याने स्थूलत्व, अशक्तपणा, दीर्घमुदतीचे आजार होऊ शकतात. उदा., गोड नाष्ट्याचे सिरियल्स स्वादिष्ट लागत असतील परंतु यामुळे रक्तशर्करा वाढू शकते आणि ऊर्जा कमी होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com