Protect Your Knees : वाढत्या वयात गुडघ्याची काळजी

वयाची पंचावन्न वर्षे ओलांडलेल्या ७० ते ८० टक्के व्यक्ती गुडघ्यातील वेदनेने त्रस्त असू शकतात.
protect your knees as you age healthy food exercise walk
protect your knees as you age healthy food exercise walksakal

- डॉ. पराग संचेती

वयाची पंचावन्न वर्षे ओलांडलेल्या ७० ते ८० टक्के व्यक्ती गुडघ्यातील वेदनेने त्रस्त असू शकतात. काहीजण या वेदना सहन करू शकतात. परंतु इतरांना ते मोठे दिव्य वाटते व अशाच व्यक्तींना गुडघ्याची पुढील झीज होऊ नये म्हणून व वेदना वाढू नयेत म्हणून उपचाराची जरुरी असते.

गुडघा हा शरीरातील सर्वांत मोठा सांधा आहे. चालताना व धावताना त्यावर सर्वाधिक ताण येतो. गुडघ्यातील वेदना ही सर्वसाधारण स्थिती असून ती अस्थीदोषांचा संधिवात, हाडे ठिसूळ झाल्यामुळे, स्थूलपणा, अस्थीबंधनाची दुखापत व गुडघ्याला अतिश्रम या कारणांमुळे संभवते. यातील बहुतेक बाबींवर विना-शस्त्रक्रियेने उपचार करता येतात. वयाच्या ५५ वर्षावरील व्यक्तींमध्ये अस्थीदोषांचा संधिवात हेच गुडघेदुखीचे प्रमुख कारण आहे. अस्थीदोषांचा संधिवात एक सर्वसाधारण प्रकारचा संधिवात आहे. (सांध्यांच्या हाडांचा दाह व वेदना यांची नेहमीची फार जवळीक आहे.

यामध्ये गुडघ्याच्या हाडांचे रक्षण करण्यासाठी कूर्चा असते ती फाटते व त्यामुळे गुडघ्याच्या वेदना लगेच होतात. बहुतेक जणांच्या बाबतीत असे आढळून आले आहे की वयस्कर व्यक्तींना होणाऱ्या गुडघ्यातील वेदना वयपरत्वे होणाऱ्या अस्थीदोष संधिवातातील होणाऱ्या सांध्याच्या झिजेमुळे होतात.

वयोमान व गुडघ्यातील वेदना

  • वय वाढत जाते तसे गुडघ्यातील कूर्चेची झीज वाढते. परिणामी गुडघा सुजणे, वेदना होणे व ताठरपणा येणे या बाबींकडे वाटचाल सुरू होते. स्थूल रुग्णांना याचा अधिक धोका आहे.

  • स्थूलपणा : वाढत्या वयानुसार तुमचे वजनही वाढत असल्यास त्याचा भार पेलण्याचे काम गुडघ्यांना ताण घेऊन करावे लागते. यामुळे झिजेचे प्रमाणही वाढते. वाढत्या वयाबरोबर, स्थूलपणा असल्यास ती अस्थीदोष संधिवात उद्‍भवण्याचा धोका वाढविणारी प्रमुख बाब आहे.

  • मांडी घालून बसणे, उकिडवे बसणे, पायऱ्या चढणे, उतरणे.

  • स्नायूतील बदल. वयाच्या ५५ वर्षानंतर तुमचे स्नायू आकारामध्ये ४० टक्के लहान होतात. परिणामी त्यांच्यातील शक्ती कमी होते. वयपरत्वे स्नायूंचा हा आधार कमी होत जातो व त्यामुळे गुडघ्यातील वेदना होतात.

लक्षणे आणि निदान

  • गुडघ्यातील वेदना अल्प ते अधिक या प्रकारात असतात. त्या कधीही पटकन उद्‍भवतात किंवा फार काळ चालू राहतात. त्या सतत राहतात किंवा अधूनमधून वाढतात.

  • गुडघ्यातील वेदनांचे निदान करण्यामध्ये रुग्णाचा पूर्ण वैद्यकीय इतिहास, भौतिक तपासणी व वेदनांचे कारण कळण्यासाठी केलेल्या निदानाच्या तपासण्या इ. बाबींचा समावेश असतो. क्ष किरण/एम.आर.आय. यासारख्या तपासण्यांमुळे संधिवाताने गुडघ्यात झालेले बदल दिसून येतात. अस्थीदोषाच्या संधिवाताच्या चार अवस्था असतात क्ष किरण तपासणीत दिसतात.

उपचार आणि प्रतिबंध

  • गुडघ्याचा संधिवात झाला आहे, असे निदान पक्के झाल्यास तो अजून वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचार तातडीने सुरू करावेत. रुग्णाप्रमाणे उपचार पद्धती बदलते. बहुतेक रुग्ण जुन्या-पुराण्या उपचारपद्धतीला प्रतिसाद देतात ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश असतो.

  • भौतिक उपचार : व्यायाम महत्त्वाचे असतात. व्यायामाच्या योग्य नियोजनात स्नायूंना सशक्त बनविणे, त्यांना खेचणे व एरोबिक व्यायाम यांचा समावेश असतो. तसेच व्यायाम करताना योग्य असे तंत्र व प्रकार वापरात आहेत याची खात्री करावी.

  • वजनातील घट : ही शरीराचा गुडघ्यावर पडणारे ओझे कमी करते.

  • जीवनक्रमातील बदल : मांडी घालून बसणे, उकिडवे बसणे आणि पायऱ्यांचा चढ-उतार करणे या गोष्टी टाळून जीवनक्रमात बदल करणे उपयोगी ठरते. तसेच अचानकपणे गुडघ्यावर भार पडेल अशी जोराची क्रिया करणे टाळावे.

  • औषधोपचार : वेदना शमविण्यास व दाह कमी करण्यासाठी उपयोगी.

  • ब्रेसेस/नि-कॅप : यामुळे गुडघ्यांना आधार मिळतो.

  • पादत्राणातील बदल : चालताना शरीराचा भार समप्रमाणात विभागला जातो.

  • इंजेक्शन : स्टेरॉईड किंवा हायलूरॉनिक अॅसिड या इंजेक्शनचा प्राथमिक अवस्थेत फायदा होतो. दाह कमी करण्यासाठी हे सांध्यातच दिले जाते.

(लेखक संचेती रुग्णालयात गुडघेरोगतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com