Mental Health : निकाल कशाचा? माझा की प्रयत्नांचा...

Self-Worth and Mental Health : प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. सुवर्णा बोबडे यांनी 'स्वयं-मूल्य' (Self-worth) आणि 'निकाल' यांतील फरक स्पष्ट केला आहे. अपयश म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पराभव नसून तो केवळ एका प्रयत्नाचा परिणाम आहे, असे सांगत त्यांनी स्वतःला 'लेबल' लावण्याऐवजी कौशल्य सुधारण्यावर भर देण्याचा सल्ला दिला आहे.
Self-Worth and Mental Health

Self-Worth and Mental Health

sakal

Updated on

डॉ. सुवर्णा बोबडे समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

अपयश म्हणजे काय?... अपयश म्हणजे एक प्रयत्न जमला नाही, हा वास्तविक अर्थ आहे. ते तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व ठरवत नाही. तसंच यश म्हणजे एक प्रयत्न जमला. ते तुम्हाला कायमचं श्रेष्ठ व्यक्ती बनवत नाही.

‘‘डॉक्टर, मी पास झाले! आता तरी मला वाटतंय की मी काही तरी आहे... नाही तर इतके दिवस मला स्वतःचाच राग येत होता.’’ सेजल सांगत होती.

‘‘म्हणजे पास होण्यापूर्वी तू ‘काहीच नव्हतीस’?’’

‘‘हो... दोनदा नापास झाले होते ना... तेव्हा वाटायचं, मी अपयशी आहे. आता वाटतं, मी केपेबल आहे.’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com