Swasthyam 2022 : ‘स्वास्थ्यम्’साठी पुण्यनगरी सज्ज

कुमार विश्वास यांच्या हस्ते उद्या उद्‌घाटन
Swasthyam 2022
Swasthyam 2022Sakal

पुणे : शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नागरिकांना शास्त्रीय मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. नागरिकांची ही गरज ओळखून, ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेअंतर्गत ९ ते ११ डिसेंबर दरम्यान पुण्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित तीन दिवसीय संपूर्ण आरोग्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. पुणेकरांकडून उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत असून प्रवेशिका घेण्यासाठी गर्दी होत आहे. ख्यातनाम कवी, व्याख्याते कुमार विश्वास यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी ६ वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे या उपक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे.

ध्यान-धारणेविषयी शास्त्रीय माहिती

ताण - तणाव, मनात सुरू असलेले वेगवेगळे विचार, भीती, काळजी अशा अनेक कारणांनी आपले शरीर व मन थकते. आपल्या शरीराचे सर्व कार्य सुरळीत चालू ठेवण्याची जबाबदारी मेंदूची असते, म्हणूनच आपल्या मेंदूचे कार्य अतिशय संतुलित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित ध्यान - धारणा आवश्यक आहे.

शरीर, इंद्रिये आणि निरोगी मनासाठी प्राणायाम

शरीराच्या विविध अवयवांतील प्राणाचे प्रमाण कमी - जास्त झाल्याने शरीरात व्याधी उत्पन्न होतात. प्राणायामामुळे प्राणशक्ती संतुलित होऊन व्याधींचा नाश होतो. नियमित प्राणायामाने शरीर, इंद्रिये आणि मन निरोगी ठेवण्यास मदत होते. प्राणायामाच्या माध्यमातून श्वास कसा घ्यावा, श्वासावर नियंत्रण कसं मिळवावं हे जाणून घेऊ शकता.

निरोगी व तंदुरुस्त आरोग्यासाठी योग

मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या चार गोष्टींचं संतुलन म्हणजे उत्तम आरोग्य. योग या शास्त्रात मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक या तीन गोष्टींचा समावेश होतो. या तीन महत्त्वपूर्ण गोष्टीने मानवी जीवनाचं योग्य संतुलन राखलं जातं.

सकस आहार आणि आरोग्य

धकाधकीच्या जीवनात आपल्या शरीराकडे, आरोग्याकडे लक्ष देणे व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. मानवाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी शरीराला पौष्टिक व सात्त्विक आहाराची आवश्यकता असते. पौष्टिक आहार कमी किंवा अधिक प्रमाणात मिळाला तरी दुष्परिणाम शरीरावर होतो.

अध्यात्म आणि सुदृढ आरोग्य यांचा सहसंबंध

अध्यात्मातून माणूस स्वतःकडे पाहण्यास शिकतो स्वतःकडे पाहिल्याने आत्मपरीक्षणाची सवय लागते. अध्यात्म हे लोकांना जीवनाचा अर्थ व सार सांगण्यासाठी, नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी व चांगल्या संस्कारांचा स्वीकार करण्यासाठी मदत करते. अध्यात्माचा सकारात्मक प्रभाव मानसिक, शारीरिक आरोग्यावर होतो.तं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com