

mirayee hospitals
esakal
बालेवाडी हायस्ट्रीट, पुणे येथील मिरायी – सेंटर फॉर ऑर्गन ट्रान्सप्लांट एक्सलन्स बाय रेला इन्स्टिट्यूट यांनी आपल्या केंद्रात अत्याधुनिक ‘इकोसेन्स फायब्रोस्कॅन® एक्स्पर्ट ६३०’ (Echosens FibroScan® Expert 630) उपकरण कार्यान्वित केल्याची घोषणा केली आहे. यामुळे प्रगत यकृत विकारांचे अचूक मूल्यमापन आणि व्यवस्थापन करण्याची केंद्राची क्षमता अधिक मजबूत झाली आहे.
जागतिक कीर्तीचे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन तसेच चेन्नई येथील रेला इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रो. मोहम्मद रेला आणि त्यांच्या तज्ज्ञ टीमच्या मार्गदर्शनाखाली मिरायी केंद्र कार्यरत आहे. रोबोटिक लिव्हर ट्रान्सप्लांटेशन आणि प्रगत रोबोटिक लिव्हर सर्जरीवर विशेष भर देत पुणे आणि उर्वरित पश्चिम भारतामध्ये जागतिक दर्जाची ट्रान्सप्लांट व लिव्हर केअर सेवा पुरवणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे.
"वैद्यकीय गुणवत्ता,नवोपक्रम आणि अनुकंपेच्या माध्यमातून पश्चिम भारतातील रोबोटिक ट्रान्सप्लांटसाठी सर्वात विश्वासार्ह केंद्र बनणे," हे या केंद्राचे ध्येय (व्हिजन) आहे. तसेच आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ व अत्यंत कुशल डॉक्टरांच्या माध्यमातून,आधुनिक नवोपक्रम व सहानुभूतीची जोड देऊन दर्जेदार आरोग्य सेवा देणे हे केंद्राचे मिशन आहे.
या ध्येयाला अनुसरून मिरायी केंद्राने dedicated हेपॅटॉलॉजी (Hepatology) आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशन मेडिसिन विभाग सुरू केला आहे, ज्याचा मुख्य भर यकृताच्या आजारांचा प्रतिबंध आणि वेळेत निदानावर आहे. त्यांचा ‘लिव्हर डिसीज प्रिव्हेन्शन अँड वेलनेस प्रोग्राम’ हा विशेषतः MASLD (मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टेअटोटिक लिव्हर डिसीज - ज्याला सामान्यतः 'फॅटी लिव्हर' म्हटले जाते) वर लक्ष केंद्रित करतो. हा आजार सध्या स्थूलपणा, मधुमेह आणि चयापचयाशी संबंधित विकारांमुळे वेगाने वाढताना दिसत आहे.