Pune : सिकलसेल अनेमियासाठी आयुर्वेदिक औषध

विद्यापीठातील रसायनशास्र विभागाचे संशोधन; डिजाइन इनोवेशन सेंटरच्या माध्यमातून 'हिमआधार'ची निर्मिती
Savitribai Phule Pune University
Savitribai Phule Pune Universityesakal

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातल्या प्राध्यापक डॉक्टर पूजा दोशी व त्यांचे विद्यार्थी नितीन कदम, युवराज काळे यांनी संशोधन करून डिजाइन इनोवेशन सेंटरच्या माध्यमातून 'हिमआधार' या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'रिसर्च पार्क फाउंडेशन'च्या माध्यमातून या आयुर्वेदिक औषधाचे उद्घाटन व व्यावसायीकरण संबंधित माहिती जाहीर करण्यात येणार आहे.

Savitribai Phule Pune University
Pune University : पुणे विद्यापीठ कुलगुरूंच्या संसारासाठी लाखो रुपये खर्च ?

इनोवेशन इन मेडिकल, फार्मास्युटिकल अँड अलाईड सायन्सेस फॉर कमर्शिअलायझेशन ऑफ टेक्नलॉजी (इम्पॅक्ट २.०) या कार्यक्रमात या औषधाबाबतची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे संचालक प्राध्यापक डॉ. अरविंद शालिग्राम यांनी दिली. हा कार्यक्रम विद्यापीठातील संत नामदेव सभागृहात सकाळी १० ते १२ या वेळात घेण्यात येणार आहे.

Savitribai Phule Pune University
Pune : पुणे महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

'हिमआधार' हे औषध सिकलसेल अनेमिया आजारा साठी आणि रक्तवर्धक,रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, रक्तशुद्धी करण्यासाठी उपयोगी असल्याचे रिसर्च पार्क फाऊंडेशनकडून सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com