

Seasonal Health Tips
sakal
Essential Health Tips to Stay Healthy During Changing Weather: पुण्यात आज झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात पुन्हा एकदा बदल जाणवू लागला आहे. कधी कडक ऊन, तर कधी अचानक पाऊस आणि त्यानंतर हवेत जाणवणारा गारवा, अशा बदलत्या हवामानाचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होऊ शकतो. अशा वातावरणात सर्दी, खोकला, ताप आणि थकवा यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे ऋतू बदलताना आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानात आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या ५ गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जाणून घेऊया...