तर काय?

माझे वय २४ वर्षे आहे. माझे केस खूप गळत आहेत. खूप उपचार घेतले, पण काही फरक नाही.
hair issue treatment Cramp in legs
hair issue treatment Cramp in legssakal

प्रश्‍न १ - माझे वय २४ वर्षे आहे. माझे केस खूप गळत आहेत. खूप उपचार घेतले, पण काही फरक नाही. अलीकडे वाढ कमी झालेली आहे. त्यामुळे केस कापावे लागत नाहीत. काय करता येईल ते सुचवावे.

- हर्षा भोर, मुळशी

उत्तर - सध्याच्या काळात केसांच्या तक्रारी भरपूर प्रमाणात प्रमाणात वाढायला लागलेल्या आहेत. शरीरात असलेल्या धातूंचे पोषण व्यवस्थित होत नसेल तर अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. आयुर्वेदाच्या मताने शरीरातील रसधातू व अस्थीधातू यांना पोषण मिळणे आवश्यक असते. यासाठी संतुलन शतानंत कल्प किंवा स्त्रीसंतुलन कल्प टाकून दूध नियमितपणे घ्यायला सुरुवात करावी. त्याचबरोबर सॅनरोझ, धात्री रसायन सारख्या रसयनांचे सेवन करणे उपयोगी ठरू शकेल.

संतुलन प्रवाळपंचामृत मोतीयुक्त गोळ्या, हेअरसॅन गोळ्या घेणे फायदेशीर आहे. आठवड्यातून २-३ वेळा केसांच्या मुळाशी संतुलन व्हिलेज हेअर तेलासारख्या तेलाचा मसाज करवा, त्यानंतर शक्य झाल्यास सॅन पित्त हेऊर पॅक १५-२० मिनिटांसाठी लावावा व नंतर संतुलन सुकेशासारख्या नैसर्गिक घटकांपासून बनविलेल्या उत्पादनाने केस धुवावे. शांपू वापरण्याची गरज पडली तर तो माइल्ड असणे बरे. शक्यतो जंक फूड व फार प्रमाणात आंबवलेले अन्न खाणे टाळणे इष्ट.

प्रश्‍न २ - माझे वय ४५ वर्षे आहे. कधी कधी मला रात्री पोटरीमध्ये क्रॅम्प येतो. क्रॅम्प आल्यानंतर झोप लागत नाही. बरेच प्रयत्न केल्यावर क्रॅम्प सुटतो. कधी कधी असहनीय वेदना होतात. याकरिता काय उपचार करता येईल?

- सुनीती चौधरी, अलिबाग

उत्तर - पोटरीमध्ये क्रॅम्प येणे हे शरीरात वातदोष वाढल्याचे लक्षण आहे. तसेच शरीरात कॅल्शियम व मॅग्नेशियम योग्य प्रमाणात नसल्यासही अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी संतुलन पादाभ्यंग घृत लावून काशाच्या वाटीने पादाभ्यंग केलेले चांगले. नंतर संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेल वापरून संपूर्ण पायावर हलक्या हाताने खालून वर या दिशेत तेल जिरवावे. तेल लावल्यावर पंख्याखाली वा एसीच्या झोतात झोपणे टाळावे.

बरोबरीने संतुलन वातबल गोळ्या, संतुलन प्रवाळपंचामृत मोतीयुक्त गोळ्या, मॅरोसॅन हे रसायन नियमितपणे घेण्याचा फायदा होऊ शकेल. सकाळी न्याहारीबरोबर खारीक पूड घालून उकळून तयार केलेले दूध घेण्याचा फायदा होऊ शकेल, यातच स्त्रीसंतुलन कल्प टाकल्यास अधिक फायदा मिळू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com