आज आहे नारळी पौर्णिमा. समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमेच्या दिवशी पूजा करून नारळ अर्पण केला जातो. श्रीफळ (नारळ) देऊन एखाद्याच्या कार्याचा गौरव-सन्मान केला तर तो सर्वात मोठा. एखाद्याला काहीतरी वस्त्र, शाल, अगदी चांदीचे ताट द्यायचे असले तरी त्याच्याबरोबरीने हळद-कुंकू लावून श्रीफळ दिले नाही तर तो सत्कार भारतीय संस्कृतीनुसार सत्कार समजला जात नाही, ती एक भेट होते.