

Could Your Salad Be Dangerous?
esakal
Cyclosporiasis: जर तुम्ही कच्चे सॅलड किंवा न धुता फळे खात असाल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. सध्या अमेरिकेत 'सायक्लोस्पोरियासिस' या पोटाच्या गंभीर आजाराने थैमान घातले आहे. अमेरिकेच्या 'सीडीसी' (CDC) या आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार, ३४ राज्यांमध्ये तब्बल १,६०० हून अधिक लोकांना या आजाराची लागण झाली असून, शेकडो रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. कच्च्या पालेभाज्या आणि फळांवरील एका विशिष्ट जंतूमुळे हा संसर्ग पसरत असल्याचे समोर आले आहे.
हा आजार 'सायक्लोस्पोरा कायटानेन्सिस' नावाच्या अतिसूक्ष्म जंतूमुळे होतो. जेव्हा मानवी विष्ठा किंवा दूषित पाणी लागलेले कच्चे अन्न, भाज्या किंवा फळे स्वच्छ न धुता खाल्ली जातात, तेव्हा हा जंतू शरीरात प्रवेश करतो. हा जंतू थेट लहान आतड्यावर हल्ला करतो आणि पोटाचे गंभीर आजार निर्माण करतो. हा आजार संसर्गजन्य नाही. म्हणजेच, हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट पसरत नाही, तर तो फक्त दूषित अन्न किंवा पाण्यानेच होतो.