Cancer Beyond the Body: The Battle of the Mind
sakal
आशा नेगी ( लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत)
‘साक्षात्कारी’ कर्करोग
कर्करोगासारखा आजार केवळ शरीरावर आघात करत नाही, तर मनालाही खोलवर जखमी करतो. अशा वेळी औषधांसोबतच ज्याची सर्वांत जास्त गरज असते, ती म्हणजे आशा. हीच आशा अनेकदा साहित्याच्या माध्यमातून मनात रुजते. कविता, कथा, लेख किंवा एखादं पुस्तक हे शब्दांचं जग कर्करोगाच्या अंधारात एक छोटासा प्रकाश देऊ शकतं. वाचन माणसाला काही काळ वेदनांपासून दूर नेतं, स्वतःशी संवाद साधायला शिकवतं आणि ‘मी यातून बाहेर पडू शकतो’ ही भावना निर्माण करतं.