Early Menopause | कमी वयात मासिक पाळी बंद का होते ? काय आहेत कारणे आणि परिणाम ? | Early Menopause Causes and Symptoms | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Early Menopause Symptoms

Early Menopause : कमी वयात मासिक पाळी बंद का होते ? काय आहेत कारणे आणि परिणाम ?

Early Menopause Causes : बहुतेक स्त्रियांना ४५ ते ५५ या वयोगटात रजोनिवृत्ती सुरू होते. युनायटेड स्टेट्समध्ये रजोनिवृत्तीचे सरासरी वय ५१ वर्षे आहे. रजोनिवृत्ती तेव्हा येते जेव्हा तुमचे अंडाशय अंडी तयार करणे थांबवते. यामुळे इस्ट्रोजेनची पातळी कमी होते.

इस्ट्रोजेन हा हार्मोन प्रजनन चक्र नियंत्रित करतो. जेव्हा तुम्हाला अनियमित मासिक पाळी येण्यास सुरुवात होते जी तुमच्या सामान्य चक्रापेक्षा जास्त लांब किंवा कमी असते तेव्हा रजोनिवृत्ती सुरू होऊ शकते. (reasons and side effects of Early Menopause)

कारणे

याची अनेक कारणे आहेत. जर तुमच्या आईची रजोनिवृत्ती लवकर आली असेल तर मुलीचीसुद्धा लवकर येईल. याशिवाय, काही ऑटोइम्यून कंडिशन किंवा ऑटो इम्यून सिंड्रोम आहेत जे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात, ज्यामुळे मासिक पाळी अकाली थांबते.

यासोबतच, जर तुमचे गर्भाशय लहान वयात काढून टाकले गेले असेल, तुम्ही कर्करोगावर उपचार घेत असाल आणि केमोथेरपी घेत असाल, तर तुमची मासिक पाळी वेळेपूर्वी थांबू शकते. धूम्रपान हे आणखी एक कारण आहे.

कमी वयातील मेनोपॉजचे परिणाम

जर एखाद्या स्त्रिला प्री-मेनोपॉज आला तर तिच्या शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण खूप कमी होते, ज्यामुळे हृदयाच्या समस्या, हाडांच्या समस्या लहान वयातच येऊ लागतात. यासोबतच वंध्यत्व देखील येऊ शकते.

रजोनिवृत्तीपूर्व परिणाम टाळण्यासाठी, योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आणि जर आपण उशिरा गर्भधारणेचे नियोजन करत असाल, तर प्रजनन क्षमता मूल्यांकन किंवा प्रजनन चाचणी वेळेवर करून घ्यावी.

सूचना : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या औषधोपचारांसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.