मोकळे व्हा : नात्यातील वागणूक आणि सवयी

पती-पत्नीच्या नात्यात विनोदाच्या नावाखाली संशय, असुरक्षितता आणि भावनिक दुखापत वाढवणाऱ्या सवयी; विश्वास, पारदर्शकता आणि परस्पर आदरच नात्याचा खरा पाया
She also highlights how planning mistakes and unhealthy communication patterns can create avoidable stress between couples.

She also highlights how planning mistakes and unhealthy communication patterns can create avoidable stress between couples.

Sakal

Updated on

डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक

प्रश्‍न : माझ्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. त्यांच्या बोलण्यात सतत इतर स्त्रियांचा विषय असतो. अनेक महिलांच्या संपर्कात असल्याचे ते सहजपणे सांगतात. ‘पुरुषांचे असे थोडेफार संबंध असतातच. तू मला कधीच रंगेहाथ पकडू शकणार नाहीस. मी तुला कधीच पुरावा मिळू देणार नाही,’ अशी वाक्ये ते वारंवार बोलतात. आमचा हॉटेल/मेसचा व्यवसाय असल्यामुळे अनेक महिला ग्राहक आणि कर्मचारीही येत असतात व त्यांच्याशी ते मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे माझ्या मनात शंका निर्माण होते. मी त्यांना ‘कुठे गेला होतात?’ किंवा ‘उशीर का झाला?’ असे विचारले, तर ‘माझ्यावर संशय घेऊ नको. मला त्रास देऊ नको.’ असे म्हणतात. त्यांचा मोबाईलही ते मला पाहू देत नाहीत. माझा रंग सावळा आहे, तर त्यांचा गोरा. त्यावरूनही ते मला टोमणे मारतात. नंतर मात्र ‘मी तुझी मस्करी करत होतो. तूच मनाला लावून घेतेस. मी तुझ्याशी प्रामाणिक आहे,’ असे सांगतात. त्यांच्या अशा बोलण्यामुळे माझ्या मनात असुरक्षितता, संभ्रम आणि संशय वाढत आहे. ते खरोखरच मस्करी करत आहेत की या बोलण्यात काही तथ्य आहे, हे मला समजत नाही. मी या परिस्थितीकडे कसे पाहावे?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com