
प्रश्न १ : मी २७ वर्षांची आहे. मला योनीभागी सतत छोटे छोटे पू-युक्त फोड येतात. त्या जागी खूप वेदना होतात, उठणे, बसणे, प्रवास करणे या गोष्टी अवघड होतात. यासाठी अँटिबायोटिक्स, क्रीम्स लावणे वगैरे सर्व उपचार केले, पण सतत अँटिबायोटिक्सचा वापर करणे चांगले नाही, असेही डॉक्टरांनी सुचवले आहे. यासाठी काय करता येईल?
...सुहासिनी वैद्य, पुणे
उत्तर : बऱ्याचदा स्त्रियांमध्ये प्रजननसंस्थेत किंवा मूत्रसंस्थेत उष्णता वाढल्यामुळे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. यावर घरी जिऱ्याचे पाणी नियमितपणे घेणे सुरू करावे. जिऱ्याचे पाणी कसे करावे या माहितीसाठी डॉ. मालविका तांबे यू-ट्यूब चॅनेलवर हिलिंग वॉटर हा व्हिडिओ नक्की बघावा. त्याचबरोबरीने संतुलन पित्तशांती, पुनर्नवासव, गोक्षुरादी गुग्गुळ या गोळ्या घेण्याचा फायदा होऊ शकतो. तज्ज्ञ वैद्यांना भेटून या तक्रारीवर प्रकृतीनुरूप औषधे, उपचार व आहाराच्या बाबतीत पथ्य पाळण्याचा फायदा होऊ शकेल. रोज न चुकता संतुलन पादाभ्यंग घृत लावून पादाभ्यंग करण्याचाही फायदा मिळू शकेल. रोज लघवी साफ होण्याकरिता जलसंतुलन वापरून उकळलेले पाणी पिणेही फायदेशीर ठरू शकेल.