Antidiabetic Plants : मधुमेह रोखण्याचे सामर्थ्य चारशे वनस्पतींमध्ये

संशोधकांचा दावा, केवळ २१ वनस्पतींवरच संशोधन
Antidiabetic Plants
Antidiabetic Plantssakal

नवी दिल्ली : बदलत्या जीवनशैलीबरोबरच मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून आता या आजारासमोर रासायनिक औषधांनी देखील हात टेकल्याचे चित्र पाहायला मिळते. मधुमेहावरील उपचारासाठी संशोधक हे आता औषधी वनस्पतींकडे आशेने पाहू लागले आहेत. या आजारावरील रामबाण औषध हे झाडांपासूनच तयार होऊ शकते असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

आपल्या सभोवताली किमान चारशे अशा औषधी वनस्पती आहेत त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते. आतापर्यंत केवळ २१ औषधी वनस्पतींबाबतच सखोल अभ्यास झाला असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

सध्या मधुमेह नियंत्रित करण्यासाठीची बरीचशी ॲलोपॅथिक औषधेही वनस्पतींशी संबंधित आहेत. या वनस्पतींपासूनच मधुमेहावरील रामबाण औषध तयार होऊ शकते हे सिद्ध झाले आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

Antidiabetic Plants
Health Tips : स्मोकिंग सुटत नाहीये? औषधं नाही तर योगासने करतील मदत

पुदुच्चेरी येथील ‘जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ आणि ‘एम्स-कल्याणी’ या संस्थेतील अभ्यासकांनी हे संशोधन केले होते. ‘वर्ल्ड जर्नल ऑफ डायबेटिस’ या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. सध्या जंगलामध्ये आढळून येणाऱ्या चारशे वनस्पतींमध्ये मधुमेहाला रोखण्याचे सामर्थ्य आहे.

हा झाडपाला ‘टाईप- टू’च्या मधुमेहाला नियंत्रित ठेवू शकतो. आतापर्यंत केवळ २१ प्रकारच्या वनस्पतींवरच हे संशोधन झाले आहे. यामध्ये विजयसार, जांभूळ, जिरे, दारूहरिद्र, तोंडली, बेल, मेथी, लिंबू, आवळा आणि हळद यांचा समावेश आहे. या सगळ्या वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणावर मधुमेह रोखणारे घटक असल्याचे स्पष्ट झाले आहेत.

Antidiabetic Plants
Ayurved : नव्या वर्षाचा संकल्प ; आरोग्याकरता वापरा आयुर्वेदाने दिलेल्या संस्कारित तेलाचे ब्रह्मास्त्र

‘बीजीआर-३४’ चा दाखला

आणखी अशाच बहुसंख्य वनस्पती असून त्यापासून मधुमेहावरील रामबाण औषध तयार केले जाऊ शकते असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. यासाठी अभ्यासकांनी ‘बीजीआर-३४’ या औषधाचे उदाहरण दिले. या गोळ्यांच्या निर्मितीसाठी दारूहरिद्र, गुरमार, मेथी आणि विजयसार या वनस्पतींमधील औषधी घटकांचा वापर करण्यात आला आहे.

मागील वर्षी ‘एम्स- दिल्ली’ने केलेल्या संशोधनामध्ये ‘बीजीआर-३४’ हे औषध केवळ रक्तातील साखरच नाही तर स्थुलत्व देखील कमी करत असल्याचे दिसून आले होते. या आयुर्वेदिक औषधाचा चयापचय प्रक्रियेलाही फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.

Antidiabetic Plants
Medical College : इमारतीचा नकाशा 50 वर्षांपूर्वी मंजूर, तरी नर्सिंगचे वर्ग होस्टेलमध्येच

या घटकांतही सामर्थ्य

डाळिंब, शिलाजित, चवळीच्या शेंगा, चहा आणि केशरामध्ये मधुमेहाला रोखणारे घटक आहेत. ‘एसजीएलटी-२’ या मधुमेहविरोधी औषधामध्ये वापरण्यात येणारा फ्लोरिझीन हा घटक सफरचंदाच्या झाडाच्या खोडापासून काढण्यात येतो असा दावा अभ्यासकांनी केला आहे.

देशातील मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून औषधी वनस्पती याच उपचारांसाठी एक नवा मार्ग दाखवू शकतात. आमच्या आयुर्वेदाची पाळेमुळे ही निसर्गात रूजलेली असून तेच आपल्याला मार्ग दाखवू शकतात.

- डॉ. संचित शर्मा, कार्यकारी संचालक एआयएमआयएल फार्मास्युटिकल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com