संस्कृतमध्ये ज्याला ‘शब्द’ म्हणतात, तो आवाज हा पंचमहाभूतांपैकी आकाश महाभूताचा विषय असतो आणि तो श्रोत्रेंद्रिय या आकाश महाभूताच्या शरीरातील प्रतिनिधीमार्फत समजून घेतला जातो. मधुर आवाज, रणकर्कश आवाज, कर्णकटू आवाज अशा अनेक प्रकारांनी आपण आवाजाचे स्वरूप स्पष्ट करत असतो.