- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
कर्करोगाच्या उपचारांदरम्यान रुग्णाला अनेक प्रकारच्या उपचारांना सामोरं जावं लागतं. उपचारांच्या काळात शरीराची ऊर्जा, स्टॅमिना आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. केस गळणं, वजन कमी–जास्त होणं, त्वचेत बदल, थकवा हे सगळं रुग्णाला मानसिकदृष्ट्याही खूप त्रासदायक ठरतं. उपचार संपल्यानंतरही शरीराला पूर्ण ताकद परत यायला वेळ लागतो.