

How to Protect Yourself from Heat Stroke During Extreme Summer Heat
sakal
Health News in Marathi: दुपारी घराबाहेर पडल्यानंतर चेहऱ्यावर जाणवणारं तिखट ऊन, दोनच पावलं टाकताच येणारा घाम आणि अचानक चढणारी अशक्तपणा–असं चित्र आता रोजचं झालं आहे. यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा लवकर सुरू झाला असून उष्णतेची तीव्रताही अधिक जाणवते आहे. अशा वाढत्या तापमानामुळे शरीरावर मोठा ताण येतो आणि न कळत लू लागणे किंवा हीट स्ट्रोक (Heat Stroke) सारख्या गंभीर तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे ही फक्त उकाड्याची समस्या नसून आरोग्यासाठीचा एक गंभीर इशारा आहे, जो वेळेत ओळखणं अत्यंत आवश्यक आहे.