

Rising Respiratory Diseases
sakal
शहरात श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून जानेवारीपासून ते १२ डिसेंबरपर्यंत श्वसनविकारासह फ्लूचे सर्वाधिक ४१ हजार ५१३ रुग्ण आढळून आले आहेत. तर, त्याखालोखाल अतिसाराचे सर्वाधिक ९ हजार रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या दवाखान्यांत उपचार करण्यात आले.
शहरातील वाढती वाहतूक, बांधकामांमधून उडणारी धूळ आणि कचरा जाळण्याचे वाढते प्रमाण यामुळे हवेची स्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. वाढलेले वायू प्रदूषण हे प्रामुख्याने श्वसनविकारांना कारणीभूत ठरते. त्यामुळे दमा, खोकला या लक्षणांमध्ये वाढ होत आहे. त्याचबरोबर श्वसनविषयक आजारांमुळे जसे स्वाईन फलू, श्वसननलिकेचा संसर्ग आदी कारणांमुळे श्वसनविकाराचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले असून यावर्षी त्याचे प्रमाण अधिक आहे.