
थोडक्यात:
रुद्राक्षाचे झाड ‘रुधीरवृक्ष’ म्हणून ओळखले जाते आणि त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव एलिओकार्पस स्फेरिक्स आहे.
हा सदा हरित वृक्ष हिमालयीन प्रदेशात आढळतो आणि त्याची उंची साधारण ८ ते १२ मीटर असते.
एप्रिल ते जुलैदरम्यान या झाडाला जांभळट किंवा हिरव्या रंगाची फळे लागतात, ज्यातील बी म्हणजे रुद्राक्ष.
Ayurvedic Uses of Rudraksha Beads: रुद्राक्षाच्या झाडाला ‘रुधीरवृक्ष’ असे म्हणतात. त्या झाडाचे वनस्पतीशास्त्रीय नाव एलिओकार्पस्, स्फेरिक्स आहे. हा सदा हरित वृक्ष हिमालयात आढळतो6. रुद्राक्षाचे झाड आठ ते बारा मीटर उंचीचे असते. झाडाची पाने चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानासारखी मात्र टोकदार आणि लांबसर स्वरूपाची असतात. या झाडाच्या पानांच्या बाजूला पांढऱ्या शुभ्र लहान स्वरूपाच्या लोंब्या येतात.
एप्रिल ते जुलैदरम्यान या झाडाला बोराच्या आकाराची गोल जांभळट रंगाची फळे येतात, तर काही झाडांना हिरव्या रंगाची फळे येतात. या फळांतील गर लिची किंवा जांभूळ फळाप्रमाणे असतो. या फळाच्या आतील बिया म्हणजे रुद्राक्ष.