Understanding Jnana Yoga
सद्गुरू (ईशा फाऊंडेशन)
इनर इंजिनिअरिंग
सद्गुरू : कधीही असा विश्वास ठेवण्याची चूक करू नका, की जीवनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला एकच गोष्ट करत राहायची आहे. एका विशिष्ट टप्प्यावर, उपलब्ध बुद्धिमत्ता आणि समज यांच्यानुसार, तुम्ही काही निर्णय घेतले आणि ते जीवनाच्या एका विशिष्ट कालावधीपर्यंत वाहून नेले. याचा अर्थ असा नाही की, ते तुम्हाला अगदी मृत्यूशय्येपर्यंत ओढत न्यायचे आहे. ‘नाही, मी हे आयुष्यभर केलं आहे, मला हे केलंच पाहिजे.’ जगण्याची ही एक मूर्ख पद्धत आहे. अगदी दररोज नाही; पण किमान काही वर्षांतून एकदा तरी, तुम्ही याकडे पाहून स्वतःचे जीवन खरोखर योग्य दिशेने जात आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे नाही का?