इनर इंजिनिअरिंग : दर्शन : दैवत पाहणे

दर्शन याचा शब्दशः अर्थ ‘बघणे’ किंवा ‘पाहणे’ असा आहे. तुम्ही म्हणता ‘मी दर्शन घेत आहे,’ तेव्हा तुम्हाला म्हणायचं असतं की ‘मी पाहतोय’ किंवा ‘मी बघतोय.’
इनर इंजिनिअरिंग : दर्शन : दैवत पाहणे

दर्शन याचा शब्दशः अर्थ ‘बघणे’ किंवा ‘पाहणे’ असा आहे. तुम्ही म्हणता ‘मी दर्शन घेत आहे,’ तेव्हा तुम्हाला म्हणायचं असतं की ‘मी पाहतोय’ किंवा ‘मी बघतोय.’ ही पूर्वेकडची संस्कृती आहे जिचा उगम जीवन प्रक्रियेच्या सखोल अभ्यासातून झाला आहे. भारतामध्ये लोक मंदिरात जातात तेव्हा ते तिथे प्रार्थना करण्यासाठी जात नाहीत. तुम्ही पाहाल, खूप गर्दी आहे, त्यांची इच्छा केवळ एवढीच आहे की देवतेबरोबर क्षणभर नेत्र भेट व्हावी, त्यांना दर्शन घ्यायचे आहे. प्रार्थना नाही, पूजा नाही, काही नाही. त्यांना इच्छा केवळ एवढीच आहे की त्यांनी देवतेला पाहावं आणि देवतेने त्यांना पाहावं.

याचा अर्थ काय? ‘मला पाहायचं आहे.’ हा विंडो शॉपिंग सारखा प्रकार आहे का? नाही. बऱ्याच लोकांना हे समजत नाही की तुम्ही म्हणता, ‘मी तुला बघतो, जेव्हा तुम्ही म्हणता, तू जे कोणी आहेस त्याचं मी दर्शन घेतो,’ त्यावेळी समोर जे आहे त्याची प्रतिमा आणि त्याचा अनुभव तुमच्या आतमध्ये घडत असतो. तुम्ही स्वतःच्या विश्वामध्ये पूर्ण बुडालेले असाल, तुम्ही जे नाही त्या गोष्टींबरोबर तुमचे अतिशय तादात्म्य झाले असेल, तर आतमध्ये काहीच शिरणार नाही. प्रतिमा फक्त तुमच्या डोळ्यांच्या बुबुळावर आदळून परत जाईल. परंतु तुम्ही आतमध्ये जितके कमी भरलेले असाल, तुमचे स्वतःचे असे फार काही नसेल आणि ती प्रतिमा योग्य रीतीने आतमध्ये स्वीकारली तर ती स्वतःच तिचा ठसा उमटवेल आणि तुमच्या आतमध्ये वृद्धिंगत होत होईल.

म्हणून लोकांना क्षणभर देवतेकडे पाहायचे असते. एकदा का तुम्ही एखादी गोष्ट पहिली आणि त्यानंतर तुम्ही तुमचे डोळे मिटले तरी ती आतमध्ये असते. तुम्हाला त्या प्रतिमेचा ठसा आतमध्ये उमटवायचा असतो आणि तुम्ही संपूर्ण मनाने दर्शन घेता आणि तुम्ही स्वतःला छोटे करता तेव्हा ती प्रतिमा वृद्धिंगत होऊन एक जिवंत प्रक्रिया बनते. आता ती तुमचा एक भाग बनते. तुम्ही स्वतःला शून्यवत करून टाकल्यावर आतमध्ये पूर्णपणे व्यापू द्याल.

दर्शन घडायचे असेल तर तुम्ही जास्तीत जास्त इनपुट आतमध्ये घेतले पाहिजे. तुम्ही इतके ध्यानस्थ असता की तुमचं असं सर्वार्थाने काही उरत नाही, तुम्ही आतून रिते झालेले असता, ही दर्शन घेण्याची उत्कृष्ट पद्धत आहे. परंतु तुम्ही आतून पूर्ण भरलेले असाल, तर हे सर्वात चांगलं होईल की तुम्ही निरतिशय प्रेम आणि हळुवारपणे दर्शन घ्या, कारण त्याच वेळी तुम्ही जे काही पाहता त्याचा ठसा सर्वांत खोलवर उमटतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com